गुलाबी साडी Lyrics in Marathi | Singer | Meaning | Full Details

गाण्याचे नाव: गुलाबी साडी (Gulabi Sadi)

गाण्याची भाषा:- मराठी

प्रकार:- लोकगीत / डान्स सॉंग

गायक:- Sanju Rathod

गीतकार:- Sanju Rathod

संगीत:- Sanju Rathod Music

Produced:- B Spark

हे गाणं 2024 मध्ये रिलीज झालं आहे.





काजळ लावुनी आले मी आज असं नका बघु अहो येते मला लाज. केला श्रृंगार आज घातलया साज दिसते मी भारी जणु अप्सरा मी खास.

अए नखरे वाली कुठे निघाली
घालुनी साडी लाल गुलाबी
पागल करते तुझी मोरनीशी चाल..

गुलाबी साड़ी आणि लाली लाल लाल
दिसते मी भारी राजा फोटो माझा काड..
गुलाबी साड़ी आणि लाली लाल लाल
दिसते मी भारी राजा फोटो माझा काड..


झाला CLOSE आता WIDE मान वरती O KEY RIGHT
फोटो काढतो असा होनार ज्याने वातावरण टाइट...
मस्त खुशी मध्ये बायको माझी करीन पिलो फाइट माझा
होऊदे पगार गिफ्ट करतो रिंग लाइट...
नको मला चहा खारी आता जेवण करून जाईन
सेलिब्रिटी तू मी तुझा P.A बनुन राहिन...
येणार सेल्फी साठी क्राउड मला फील होणारं प्राउड जाशील Insta वर लाइव अन मी कमेंट करत पाहिन...
करीन कष्ट माझ्या पैशाने घेणार मेकअप किट
राजा होनार मी INSTA ची स्टार...
हाय्ये ये ये
गुलाबी साड़ी आणि लाली लाल लाल
दिसते मी भारी राजा फोटो माझा काड....
किती मी क्यूट किती गोड किती छान
दिसते मी भारी राजा फोटो माझा काड....

अदा माझी सिंपल नसले जरी डिंपल हिरोईन दिसते मी हिरोईन...

थोडे दिवस थांब अशी लाईन लागेल लांब मी पण बनूनच दाखवीन हिरोईन...
अय्ये माझी चाशनी तू माझी खास मी तुझा समर्थक उद्या पण आज भी बोल्लेलो किस्मी ती बोल्ली आज नाय बनू नको म्हणे इम्रान हाश्मी...

माथ्याची टिकली पैंजण बांगडी हिऱ्याची अंगठी मारुती कार विथ चांदीच कंगण सोन्याचा गंठन करीन गिफ्ट हा नाय करत मजाक मी ..

पुरी करीन तुझी हर एक विष
नको करू शंका ना सवाल...

हाय..
गुलाबी साड़ी आणि लाली लाल लाल दिसते ती भारी म्हणे फोटो माझा काड....
गुलाबी साड़ी आणि लाली लाल लाल दिसते ती भारी म्हणे फोटो माझा काड..

_______________________________________________

"गुलाबी साडी" हे Sanju Rathod यांचे अतिशय लोकप्रिय मराठी गाणे आहे. आकर्षक संगीत, सहज लक्षात राहणारे बोल आणि दमदार बीट्समुळे हे गाणे सोशल मीडियावर, विशेषतः Instagram Reels आणि YouTube Shorts वर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले. आजही हे गाणे लग्नसमारंभ, पार्टी आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये मोठ्या उत्साहाने वाजवले जाते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या